नाशिक: ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ राजेंद्र कुलकर्णी यांना मानद फेलोशिप प्रदान

नाशिक। दि. ९ मे २०२६: येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ राजेंद्र कुलकर्णी यांना, त्यांच्या गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स ( आय ए पी) या राष्ट्रीय संस्थेने फेलो ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स हा मानाचा पुरस्कार प्रदान करून नुकतेच गौरवण्यात आले.

कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत , आय ए पी च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ नीलम मोहन यांनी मानपत्र अर्पण करून डॉ राजेंद्र कुलकर्णी यांचा सत्कार केला. डॉ राजेंद्र कुलकर्णी हे गेल्या तीस वर्षांपासून बाल आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. आय ए पीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी चे ते सर्वात तरुण सदस्य होते. आणि विक्रमी सहा वेळा त्यांनी ते पद भूषवले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

दरवर्षी IAP साठी आणि भारतातील बालआरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या आधारे अतिशय मोजक्या सदस्यांना हा मान राष्ट्रीय स्तरावर प्रदान केला जातो. डॉ. राजेंद्र कुलकर्णी हे IAP चे अत्यंत सक्रिय सदस्य राहिले आहेत. स्थानिक शाखेचे सचिव, राज्य शाखेचे सचिव आणि विक्रमी सहा वेळा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशी त्यांची उल्लेखनीय वाटचाल राहिली आहे.

IAP साठी त्यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमांपैकी काही ठळक आणि विशेष बाबी पुढीलप्रमाणे आहेत –
१) काही वर्षापूर्वी बालरोगशास्त्र अंतर्गत सुपर स्पेशलायझेशन करण्याची संधी नव्हती. अशावेळी २००४ साली IAP अंतर्गत अशा विविध बालरोग उपविशेषता मध्ये विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांची संकल्पना त्यांनी मांडली, जेणेकरून नवीन पिढीकडे अशा अत्याधुनिक शाखांचे ज्ञान आणि कौशल्य विकसित होऊ शकेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

आणि त्याद्वारे भारतातील बाल आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील. त्यानंतर अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा करत, त्यांनी त्यासाठी आवश्यक प्रोटोकॉल विकसित केला. आणि IAP अंतर्गत अशा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इंडियन कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.

त्यामुळेच आज देशभर अनेक शहरात उपलब्ध असलेले बालरोग शास्त्रातील हृदयरोग, नवजात शिशु , संसर्गजन्य रोगांची काळजी, श्वसन संस्था संबंधित आजार इत्यादी अनेक शाखांचे तज्ञ हे असेच विशेष प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि त्यांच्या सेवा लहान मुलांसाठी विशेष लाभदायी ठरल्या आहेत. याचे संपूर्ण श्रेय डॉ राजेंद्र कुलकर्णी यांना दिले जाते.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

२) सन २००२ मध्ये IAP महाराष्ट्र राज्य शाखेचे संकेतस्थळ त्यांनी विकसित केले., ३) SPOP, SCPOP, RTI या आणि अशा अनेक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (मॉड्यूल्ससाठी ) राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कार्य केले. आणि विविध राज्यांमध्ये शेकडो बालरोग तज्ज्ञांना प्रशिक्षित केले.

यंदाच्या वर्षी अशा पुरस्कारार्थींच्या यादीत कोव्हिड काळात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ रमण गंगाखेडकर यांचादेखील समावेश होता.

या पुरस्काराबद्दल डॉ सुभाष काश्यपे , डॉ अमोल पवार, डॉ रमाकांत पाटील, डॉ पंकज गाजरे, डॉ अरुण गचाले, डॉ रवींद्र सोनवणे, डॉ शर्मिला कुलकर्णी, डॉ सागर भालेराव, डॉ दीपश्री तयार आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ञांनी डॉ राजेंद्र कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790