नाशिक: दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास

नाशिक। दि. ६ मे २०२६: दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी मंगळवारी (दि. ५) हा निकाल दिला. चंदर दौलत गांगोडे (वय ३५, रा. डांगराळे, ता. सुरगाणा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका पोलिसांची धडक कारवाई; चार तडीपार आरोपी जेरबंद, शस्त्र जप्त

अभियोग पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी नांदुरी (ता. कळवण) आणि राजोळे (ता. सुरगाणा) परिसरात आरोपीने दोन अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांच्यावर अत्याचार केला होता. ‘तुमचे इतर मुलांसोबत संबंध असल्याचे घरच्यांना सांगीन’ अशी धमकी देत आरोपीने दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे तपासात समोर आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नऊ हजार रुपयांच्या उसनवारीच्या वादातून युवकाची हत्या; आरोपीला १२ तासांत अटक

पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर सुरगाणा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

खटल्यादरम्यान फिर्यादी, पंच, साक्षीदार तसेच तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. भानुप्रिया पेठकर यांनी कामकाज पाहिले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790