नाशिक: बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा

नाशिक। दि. ०६ मे २०२६: सातपूर बसस्थानकासमोर भरधाव एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील ४ संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी; निदा खान फरारच !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील परशराम उगलमुगले (वय ३१, रा. रामशेज, दिंडोरी) हे पिंपळगाव बहुला येथून नाशिक रोडकडे कामासाठी दुचाकीवरून जात होते. महिंद्रा सर्कलजवळील सातपूर बसस्थानकासमोर आल्यानंतर एमएच ०४ एलक्यू ९४५८ क्रमांकाच्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

बस चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अपघातात उगलमुगले यांच्या हात व पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास सातपूर पोलिस करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790