आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटूबियांचे सांत्वन

नाशिक, दि. 25 एप्रिल 2026 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ह्दयविकाराने आज निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार ॲड ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देवून ढिकले कुटुंबियांचे सांत्वन केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी त्यांचे समवेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, तहसलीदार पंकज पवार, अपर तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790