नाशिक महानगरपालिका प्रभाग समिती सभापतिपदांची निवडणूक 30 एप्रिलला

नाशिक। दि. २५ एप्रिल २०२६: मनपाच्या सहा प्रभाग समिती सभापती पदांसाठीची निवडणूक ३० एप्रिलला पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांना २८ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अप्पर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

सध्या ७२ नगरसेवकांसह भाजप महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्याखालोखाल शिवसेना शिंदे गट (२६), ठाकरे गट (१५) आहे. पक्षीय बलाबल पाहता सर्व सहाही प्रभाग समित्यांवर भाजपचाच दबदबा राहण्याची दाट शक्यता आहे. या नवनिर्वाचित सभापतींची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तात्पुरते एपीएमसी परवाने व खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती

निवडणुकीचे वेळापत्रक (३० एप्रिल): पूर्व- सकाळी १० ते ११, पश्चिम- सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०, पंचवटी- दुपारी १ ते २, नवीन नाशिक- दुपारी २.३० ते ३.३०, सातपूर- दुपारी ४ ते सायं. ५, नाशिकरोड- सायंकाळी ५.३० ते ६.३०.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790