
नाशिक। दि. १२ फेब्रुवारी २०२६: अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक येथे हृदयविकाराच्या उच्च-जोखीम असलेल्या ५६ वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक मिनिमली इन्वेसिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (MICS CABG) म्हणजेच छातीचे हाड न कापता रिबकेज मधील मोकळ्या जागेतुन शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
संबंधित रुग्णाला अलीकडेच हृदयविकाराचा झटका (Myocardial Infarction) आला होता तसेच त्यांना हृदयाला रक्तपुरवठा जाणाऱ्या ३ पेक्षा जास्त रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज आढळून आले व, तसेच हृदयविकाराचा झटका आल्याने हृदयाची क्षमता देखील कमी झालेली आढळून आली, सोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपानाची सवय आणि डिस्लिपिडेमिया अशी जोखीमकारक स्थिती होती.
अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदयरोग तज्ञ डॉ अझहर सय्यद यांनी सविस्तर तपासणी नंतर, शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, डाव्या बाजूच्या लहान चिराद्वारे (Left Thoracotomy) करण्यात आली. यामध्ये LIMA–LAD आणि Radial–OM ग्राफ्टद्वारे टोटल आर्टेरियल रिव्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे शुद्ध रक्त वाहिन्यांचा उपयोग करण्यात आला, जे दीर्घकालीन उत्तम परिणामांसाठी ओळखले जाते.
शस्त्रक्रिया डॉ. अझहर सय्यद, कार्डिअॅक सर्जन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. भूपेश पराते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच सिनियर कार्डिअॅक सर्जन डॉ. अभयसिंह वालिया यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी बोलतांना डॉ. अझहर यांनी हृदयरोग शस्त्रक्रियेतील MICS आधुनिक पद्धतीने मुळे रुग्णांना बायपास सर्जरीला घाबरण्याची गरज नसून अगदी ४ दिवसात सुट्टी होऊन रुग्ण आपल्या नियमित आयुष्यात त्वरित कार्यरत होऊ शकतो, यात छातीचे हाड कापले जात नसल्याने रिकव्हरी जलद शक्य होऊन पेशंटला पुढील आयुष्यात अनेक गुंतागुंत टाळणे शक्य होते.
MICS पद्धतीचे फायदे –
लहान चिरा ( छोटी जखम )
कमी वेदना कमी रक्तस्त्राव
जलद रिकव्हरी
जखमेतील संसर्गाचा धोका कमी
जखमेचा व्रण छोटा
छातीचे हाड न कापल्याने, हाड जुळण्याची वेदना व गुंतागुंत नाही
फुफुसांचे कार्य लवकर सुधारते
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला केवळ ४ तासांत व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी चालण्यास सुरुवात झाली आणि वेदना अत्यल्प प्रमाणात राहिल्या. रुग्णाची प्रकृती स्थिर राहिल्याने केवळ ४ दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला, जे उच्च-जोखीम रुग्णासाठी उल्लेखनीय यश मानले जाते.
अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक येथील कार्डिअॅक सायन्सेस विभाग, भूलतज्ज्ञ आणि आयसीयू टीम व प्रशिक्षित नर्सिंग केअर यांच्या समन्वित कार्यामुळे हे यश शक्य झाले.
अपोलो हॉस्पिटल्स, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिप्तेंदू पांडा यांनी या यशाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करतांना हे यश नाशिकमधील अत्याधुनिक हृदय उपचार क्षमतेचे प्रतीक असल्याचे सांगितले तसेच आधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टर्स टिम द्वारे आरोग्यक्षेत्रात नवीन मानदंड स्थापित करण्यात अपोलो हॉस्पिटल्स समर्पित असून भारतात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने सुरू झालेला हा प्रवास आज एक जागतिक आरोग्यसेवा समूह बनला आहे. असे सांगितले
![]()

