नाशिक: दीड वर्षापासून फरार एमडी ड्रग्ज तस्कर अटकेत !

नाशिक। दि. ३० नोव्हेंबर २०२५: दीड वर्षापासून फरार एमडी ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली. नाशिकरोड युनिट पथकाने इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई केली. जफर इस्माइल पटेल असे या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

उपनिरीक्षक संदीप पवार यांनी माहिती दिली. २४ मार्च २०२४ रोजी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सागर शिंदे, जफर पटेल, सैफुल्ला भाई या संशयिताविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक केली होती. गुन्हा घडल्यापासून संशयित पटेल फरार होता. पटेल इगतपुरी रेल्वेस्थानकात मिळेल ते काम करत आहे. पथकाचे दत्तात्रय चकोर, पोटिंदे यांनी फेरीवाला

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

विक्रेत्याचे वेशांतर करत स्थानकावर सापळा रचला. संशयित भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असताना त्याला ताब्यात घेतले. चौकशीत जाफर इस्माइल पटेल (रा. पिंप्री सदो, इगतपुरी) असे नाव सांगितले. संशयिताला नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790