नाशिक: हॉटेल व्यावसायीक बापलेकांनी मेडिकल स्टोअर्स चालकास केली बेदम मारहाण

नाशिक: हॉटेल व्यावसायीक बापलेकांनी मेडिकल स्टोअर्स चालकास केली बेदम मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): कुठलेही कारण नसतांना बाप लेकांनी मिळून एका मेडिकल स्टोअर्स चालकास बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे…

देवळाली गावात हॉटेल व्यावसायीक बापलेकांनी शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअर्स चालकास बेदम मारहाण केली.

🔎 हे वाचलं का?:  परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

या घटनेत मेडिकल दुकानदार जखमी झाला आहे.

याप्रकरणी दिनेश प्रकाश चोपडा (रा.जैन भवन शेजारी,देवळालीगाव) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  TCS प्रकरण: फॉरेन फंडिंगचा संशय; एटीएस, ‘एनआयए’शी पत्रव्यवहार

प्रकाश म्हस्के, आकाश म्हस्के आणि त्यांचा एक साथीदार अशी मेडिकल दुकानदारास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. चोपडा यांचे आपल्या घराशेजारीच श्रीमान टॉवर या इमारतीत मयुर मेडिकल व जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुकानात असतांना मेडिकल दुकानासमोरील हॉटेल मालक म्हस्के बापलेकांसह एकाने कुठलेही कारण नसतांना दुकानासमोर येवून चोपडा यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत चोपडा यांना काऊंटरवर ढकलून देण्यात आल्याने काच फुटून ते जखमी झाले असून, शेजारी राज आहिरे यांनी त्यांना तात्काळ जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790