पंचवटी: लिफ्टचा दरवाजा लावल्याच्या रागातून युवकावर चाकूने हल्ला

पंचवटी: लिफ्टचा दरवाजा लावल्याच्या रागातून युवकावर चाकूने हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): लिफ्टचा दरवाजा लावल्याच्या रागातून एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटीतील सेवाकुंज भागात इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा लावून घेतल्याच्या संशयातून एकाने ३३ वर्षीय तरूणावर चाकू हल्ला केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जलवाहिनी फुटली; नाशिक शहरातील 'या' भागांत आज (दि. २६) पाणीपुरवठा बंद राहणार

या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव रत्नाकर महाजन असे चाकू हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कामांवर पावसाळ्यापूर्वी सुरक्षा उपाय बंधनकारक; ३१ मेपर्यंत सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश

याप्रकरणी उमेश भास्कर पाटील (रा.माळोदेनगर,आडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील शुक्रवारी दुपारच्या सुमारास सेवाकुंज येथील रघुवीर प्लाझा या बिल्डींगच्या लिफ्टमधून बेसमेंटला उतरत असतांना ही घटना घडली. लिफ्टचा दरवाजा उघडताच संशयिताने तू मला बघून लिफ्टचा दरवाजा का बंद केला या कारणातून कुरापत काढून पाटील यांना शिवीगाळ केली. तसेच तू माझ्या नादी लागला तर पाहून घेईल अशी धमकी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत संशयिताने धारदार चाकूने पाटील यांच्यावर हल्ला केला. पाटील यांच्या हातावर व पाठीवर वार करण्यात आल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790