Amazon

संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार !

नाशिक। दि. २२ ऑक्टोबर २०२६: शहरातील प्रमुख पाईपलाईनची दुरुस्ती आणि अत्यावश्यक कामांसाठी महापालिकेने शनिवारी (ता. २४) संपूर्ण दिवसाचा शटडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत १२ ते १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असून, रविवारी (ता. २५) सकाळचा पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

पूर्व विभागात: लेखानगर सर्व्हिस रोड लगत ३०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनवरील गळती बंद करणे आणि कलानगर जलकुंभाची वितरण वाहिनी अस्तित्वातील वाहिनीला जोडणे. पश्चिम विभागात रामराज्य जलकुंभ, त्र्यंबक रोड पीटीसी भिंतीलगत गळती बंद करणे, जीपीओ जलकुंभ येथे नवीन व्हॉल्व बसविणे आणि बी. डी. भालेकर मैदान येथे टी टाकणे हे कामे केली जाणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी दोन आठवड्यांत आराखडा द्या! उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश

नाशिक रोड विभागात: पाटील गॅरेज मागे मंदिराजवळ, महेशनगर कलंत्री घराजवळ, हांडोरे मळा वडनेर रोड, रेजिमेंटल प्लाझा एचडीएफसी बँकेसमोर दूषित पुरवठा शोधणे, वडनेर चौफुली, देवळाली गाव मिस्तरी इंजिनिअरिंग जवळ, मुक्तिधाम टाकीखालील व्हॉल्व ग्रीसिंग, राजवाडा व्हॉल्व ग्रीसिंग, विहितगाव टाकी आऊटलेट लिकेज बंद करणे आणि जयभवानी टाकीसमोर लिकेज काढण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात ‘जी राम जी’ योजनेंतर्गत ६४ हजार ५२७ कामांचा आराखडा तयार

पंचवटी विभागात: कॅनॉलवरील म्हसरूळ बोरगड उर्ध्ववाहिनी दुरुस्ती, अमृतधाम चौफुलीवर मुख्य वितरण वाहिनीवर क्रॉस कनेक्शन आणि शक्तीनगर नवीन उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन दुरुस्ती.

सातपूर विभागात: संत कबीरनगर साई मंदिराजवळ व आनंदी आंगन जॉगिंग ट्रॅक आणि सिरीन मिडोजजवळ तिरुमाला ओमकार साईमंदिराजवळ पाईपलाईन गळती बंद करणे, सिडको विभागात पाथर्डी फाटा जलकुंभ व्हॉल्व्ह गळती बंद करणे, स्मशानभूमी अंबडगावजवळ पाइपलाइन गळती बंद करणे, डीजीपीनगर माऊली लॉन्स येथे मुख्य गुरुत्व वाहिनीवरील गळती बंद करणे आणि विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र येथे व्हॉल्व बसविणे ही कामे केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790