Amazon

त्र्यंबकेश्वरमध्ये ३० व ३१ ऑक्टोबर रोजी वाहतुकीत बदल

नाशिक। दि. २९ ऑक्टोबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळयासाठी भाविक, नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते ३१ ऑक्टोबर, 2026 रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक नियमन लागू राहणार आहे. या कालावधीत त्र्यंबकेश्वर गावातील स्थानिक रहिवाशांची वाहने तसेच गावाबाहेरील वाहनांच्या वाहतुकीसाठी निश्चित पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच आवश्यकतेनुसार नो-एंट्री व्यवस्था लागू करण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील बँकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मंजूर मदतीतून कर्जवसुली करू नये

त्र्यंबकेश्वर गावातील स्थानिक रहिवाशांच्या वाहनांसाठी गावात येताना व गावाबाहेर जाताना रिंगरोड, निवृत्तिनाथ मंदिर, पोलिस स्टेशन, थ्री लिव्हज हॉटेल आणि कुंभारतळे पार्किंग- जुना जव्हार फाटा या मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नाशिककडे जाणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी सापगाव मार्गाचा वापर करावा. वाहतूक नियमनाच्या कालावधीत गावाबाहेरील वाहनांना नवीन जव्हार फाटा येथून त्र्यंबकेश्वर गावात प्रवेश करण्यास बंदी राहणार आहे. तसेच रिंगरोड येथूनही गावात प्रवेशासाठी निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष ‘माय स्टॅम्प’चे ३१ ऑक्टोबरला अनावरण

आवश्यकतेनुसार नो-एंट्री व्यवस्था लागू करून वाहतूक नियंत्रित करण्यात येईल. तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती व प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांसाठी नवीन जव्हार फाटा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लक्ष्मीनारायण चौक या मार्गांवरून केवळ शासनाने किंवा सक्षम प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. इतर सर्व वाहनांना या मार्गांवर प्रवेश बंद राहील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार करणाऱ्या पतीला १० वर्षे सक्तमजुरी

शासन अथवा प्रशासनाची विशेष परवानगी नसलेल्या बाहेरील वाहनांना त्र्यंबकेश्वर शहरातील गावाच्या व प्रतिबंधित भागात प्रवेश देण्यात येणार नाही. संबंधित वाहनचालकांनी जुना जव्हार फाटा-थ्री लिव्हज हॉटेल-कुंभारतळे पार्किंग-निवृत्तीनाथ मंदिर-रिंगरोड या पर्यायी मार्गांचा व पार्किंग व्यवस्थेचा वापर करावा, असे अपर जिल्हादंडधिकारी श्री. राजपूत यांनी आदेशात नमुद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790