नाशिक: मुक्त विद्यापीठाचा उद्या (दि. ४) दीक्षान्त सोहळा !

नाशिक। दि.३ फेब्रुवारी २०२६: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त समारंभ बुधवारी (दि. ४) सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या मुख्य आवारात होणार आहे.

या दीक्षान्त समारंभाला भारत सरकारचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निर्मलजित सिंह कलसी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे राहणार असून प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे व परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी याबाबत माहिती दिली. या पदवी प्रदान सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

दीक्षान्त समारंभात ७७ दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे हे ठळक उदाहरण ठरणार आहे.

तसेच या दीक्षान्त समारंभात ६० वर्षांवरील २०८ विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षण शक्य आहे, हा संदेश देणारी यांनी दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

अत्याधुनिक प्रमाणपत्रे:
या दीक्षान्त समारंभापासून देण्यात येणारी पदवी व पदविका प्रमाणपत्रे त्यावर अत्याधुनिक स्वरूपाची असून त्य १६ अंकी अपार / एबीसी आयडी तसेच ब्लॉकचेन प्रणालीवर आधारित क्यूआर कोड असणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता तपासता येणार आहे.

डिजीलॉकर तसेच ई-सुविधा मोबाईल अॅप वर प्रमाणपत्राची डिजिटल ई-कॉपी दीक्षान्त समारंभानंतर त्वरित उपलब्ध होणार आहे. प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचा रंगीत फोटो व आईचे नाव नमूद करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

बारदान फाटा (गंगापूर रोड) येथून सकाळी ७ ते ९ दरम्यान विद्यापीठ परिसरापर्यंत तसेच दुपारी १२ ते २ या वेळेत विद्यापीठातून बारदान फाटा परिसरात मोफत वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे.

राज्यातील विविध कारागृहांतील ६८ बंदीजनांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून पुनर्वसन व समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश घडवून आणण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने हा उपक्रम राबवला आहे. त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद लाभतो.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790