Amazon

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण

मुंबई। दि. २४ ऑक्टोबर २०२६: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण कुंभमेळा मंत्री तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना दिले.

🔎 हे वाचलं का?:  नवमतदार नोंदणीसाठी अवघे चार दिवस शिल्लक; नाशिक जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त

यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीची तसेच या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या सोहळ्याच्या नियोजनाची माहिती राज्यपालांना दिली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची महत्त्वपूर्ण केंद्रे असून, सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवाचे दर्शन घडविणारा महत्त्वाचा उत्सव आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून देशभरातील संत-महंत, साधू आणि भाविकांच्या श्रद्धेला एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद राहणार !

सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन भव्य, दिव्य, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांची सोय आणि विविध प्रशासकीय व्यवस्थांच्या नियोजनावर भर देण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी दिली.

यापूर्वी देखील सन 2015 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी सुरक्षित कुंभ कशा पद्धतीने पार पाडला व यशस्वी नियोजन करण्यात आले होते याबद्दल देखील माहिती राज्यपाल महोदयांना मंत्री महाजन यांनी दिली. या भेटीप्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि लोकभवन कार्यालयाचे प्रबंधक निशिकांत देशपांडे उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790