नाशिक: उन्हाळ्याची चाहूल; नाशिकमध्ये कमाल तापमानाचा पारा ३४.३ अंशांवर

नाशिक | दि. २३ फेब्रुवारी २०२६: शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते; मात्र रविवारी (दि. २२) आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा तडाखा प्रकर्षाने जाणवला. दिवसभर कोरडे हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे तापमानात वाढ झाली असून कमाल तापमानाचा पारा ३४.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

कमाल तापमानात वाढ नोंदली गेली असली तरी किमान तापमानात गेल्या २४ तासांत २.६ अंशांची घट झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी उकाड्यात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

गुरुवारपासून शहरात तापमान सातत्याने वाढत आहे. गुरुवारी ३१.१ अंशांवर असलेले कमाल तापमान रविवारी जवळपास ३५ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले. सकाळी हवेतील आर्द्रता ८१ टक्क्यांपर्यंत होती; मात्र सायंकाळपर्यंत ती थेट १८ टक्क्यांपर्यंत खाली आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

फेब्रुवारीच्या अखेरीस तापमानात होत असलेली ही वाढ आगामी उन्हाळा तीव्र राहण्याचे संकेत देत आहे. यंदा एप्रिलमध्ये तापमान चाळिशी पार करण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच, चालू वर्षीचा उन्हाळा अधिक कडक राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

रविवारी दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढल्याने शहरातील रस्त्यांवर तुलनेने वर्दळ कमी दिसून आली. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790