नाशिक: म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त वाहतूक मार्गांत ३ दिवस बदल

नाशिक। दि. २२ फेब्रुवारी २०२६: देवळालीत श्री म्हसोबा महाराज यात्रा सोमवार (दि. २३) पासून आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमादरम्यान अनुराधा चौकापासून राजवाड्यापर्यंत गर्दी होणार असल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

वाहतूक बदल असा:
२३ फेब्रुवारी :
सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सत्कार पाँईट ते राजवाडा चौकापर्यंत एकेरी वाहतुक रहाणार आहे.
२३ ते २५ फेब्रुवारी : रोज सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजपेर्यंत सत्कार पाँईट ते राजवाडा चौकापर्यत वाहतुक बंद रहाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

पर्यायी मार्ग: नाशिकरोड ते देवळाली कॅम्प या मार्गावरील जाणारे येणारे वाहने ही नाशिकरोड कोर्टाकडून अनुराधा चौक, जैनभवन, आर्टीलरी सेंटर चौक, रोकडोबावाडी, हांडोरे चौकमार्गे विहीतगाव मार्गे जातील. तर देवळाली कॅम्प व विहीतगावाकडून येणारी वाहने ही राजवाडा चौकापासून तक्षशिला विद्यालय, मालधक्कारोड, रेल्वे स्टेशनकडून मार्ग रहाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790