नाशिक: स्कॉर्पिओच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक। दि. २३ फेब्रुवारी २०२६: उसाच्या रसाच्या गाडीजवळ उभा असताना भरधाव स्कॉर्पिओने उडविल्याने मयुर सुरेश भोये (१५) रा. लक्ष्मी नगर, तवली फाटा, याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान स्कॉर्पिओचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  ईकेवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका-मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

हा अपघात पेठ रोडवरील तवली फाटा येथे रविवारी (दि.२२) दुपारी चार वाजता झाला. मयुर रस्ता नीट क्रॉस करून रसाच्या गाडीजवळ आला होता. तेव्हा पेठ रोडकडे जाणाऱ्या एम.एच.१५, के. के. ६४६४ या क्रमाकांच्या स्कॉर्पिओने मयुरला जोरदार धडक मारली. कार शहरातून पेठ रोडकडे जात होती. मयुरच्या डोक्यास जबर मार लागला.

🔎 हे वाचलं का?:  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे नाशिक येथे 16 एप्रिल रोजी आयोजन

कुटुंबीयांनी त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात स्कॉर्पिओचालक अमोल रमेश ढगे (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) आणि गणेश उत्तम पेलमहाले (रा. चाचडगाव, ता. दिंडोरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास म्हसरुळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी करत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १३०/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790