🌞 आजचे तापमान- किमान: 14.8°C । कमाल: 32.3 °C

नाशिकमध्ये तीन दिवस राहणार कोरडे वातावरण

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील वातावरणात दररोज कमालीचा बदल होत आहे. सोमवारी वाऱ्याची द्रोणीय रेषा विदर्भ व मराठवाडामार्गे जातेय. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील तीन-चार दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये मात्र वातावरण कोरडे राहणार आहे. सोमवारी शहरात किमान २०.३ तर कमाल ३८.१ तापमान होते. मंगळवार, १५ एप्रिल रोजी सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून १.२२ कोटींची फसवणूक; सातपूरमधील संशयिताला अटक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790