नाशिक: वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ‘इतक्या’ वाहनचालकांना ई-चलन; बेशिस्त चालणार नाही !

नाशिक। दि. २२ फेब्रुवारी २०२६: शहरातील वाहतूक शिस्त कडक करण्याच्या दृष्टीने ४० प्रमुख सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगसह अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. शुक्रवार (दि. २०) पासून रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन (RLVD) आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) प्रणालीच्या माध्यमातून सिग्नल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

पहिल्याच दिवशी तब्बल १९ हजार ७९० वाहनचालक सिग्नल नियम मोडताना सीसीटीव्हीत कैद झाले. शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सीबीएस, मेहर सिग्नल, एटीआय, विद्या विकास सर्कल आणि एबीबी सिग्नल परिसरात नियमभंगाच्या घटना मोठ्या प्रमाणात नोंदल्या गेल्या. यापैकी १५० वाहनचालकांवर ई-चलनद्वारे दंड आकारण्यात आला. दरम्यान, ४० सिग्नलवर दिवसभरात १२ हजार ३७० वाहनचालकांनी झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे किंवा सिग्नलचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

अशी होते दंडात्मक कारवाई:
सिग्नलवरील RLVD आणि नंबर प्लेट रीडर प्रणाली सिग्नल तोडणे किंवा स्टॉप लाईन ओलांडणे यासारख्या प्रकारांची स्वयंचलित नोंद करते. संबंधित वाहनांचे छायाचित्र व व्हिडिओ फुटेज सर्व्हरवर पाठविले जाते. त्यामध्ये दिनांक, वेळ, ठिकाण आणि वाहन क्रमांकाची माहिती नमूद असते.

नियंत्रण कक्षातील कर्मचारी फुटेजची पडताळणी करून नियमभंगाची खात्री करतात आणि ई-चलन प्रणालीद्वारे दंडाची नोंद करतात. काही क्षणांतच वाहनमालकाच्या मोबाईलवर उल्लंघनाचा संदेश पाठविला जातो. संबंधित दंड ऑनलाइन पद्धतीने किंवा पोलिस आयुक्तालयात प्रत्यक्ष जाऊन भरता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790