नाशिक परिमंडलात ३ लाख १८ हजार घरगुती स्मार्ट; वीजबिलात ३२ लाखाची सवलत

नाशिक। दि. २२ फेब्रुवारी २०२६: महावितरणच्या टीओडी स्मार्ट मिटर असलेल्या घरगुती ग्राहकांना लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीज वापरावर वीज बिलात टीओडी सवलत लागू असून, नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत असून एकूण ३ लाख १८ हजार ८६१ स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना जानेवारी २०२६ या एका महिन्यात एकूण ३१ लाख ९३ हजार रुपयांची सवलत वीज बिलात मिळाली आहे.

जुलै २०२५ पासून नाशिक परिमंडळ अंतर्गत नाशिक मंडळात १ लाख ५४ हजार ११३ ग्राहकांना १ कोटी ३५ लाख ४४ हजार, मालेगांव मंडळात ३८ हजार ७७२ ग्राहकांना १८ लाख ४७ हजार तर अहिल्यानगर मंडळात १ लाख २५ हजार ९७६ ग्राहकांना ८८ लाख ६४ हजार असे एकूण नाशिक परिमंडळात ३ लाख १८ हजार ८६१ ग्राहकांना सवलत मिळाली आहे. तसेच जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत २ कोटी ४२ लाख ५६ हजार रुपयांची एकूण सवलत ग्राहकांना प्राप्त झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

महावितरणकडून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला असून महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा दि. १ जुलैपासून सुरु झाला असून महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहे. तसेच घरात किती वीज वापरली याची माहिती सर्व माहिती संबंधित ग्राहकाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे योग्य वीज वापराचे नियोजन करता येईल. यासह ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोगा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार आहे. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790