नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

नाशिक। दि. ८ सप्टेंबर २०२६: तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी (दि.८) सुनावणी होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन याचिकाकर्त्यांनी केलेल्या तातडीच्या सुनावणीच्या मागणीला न्यायालयाने मागील सुनावणीवेळी मान्यता दिली होती. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने घेण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक; ८ गुन्ह्यांची उकल, ६.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुंभमेळ्याचे आयोजन जवळ येत असताना महापालिकेकडून तपोवन परिसरात वृक्षतोड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीस स्थगिती मिळविण्यासाठी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790