TCS प्रकरण: बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी निदा खान हिच्या शोधासाठी तीन पथके

नाशिक। दि. १८ एप्रिल २०२६: नाशिक टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

सदर गुन्ह्यांची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या आदेशान्वये विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे.

नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी निदा खान हिच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. तपासादरम्यान मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत निदा खान हिच्या पतीस ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आरोपी निदा ही नातेवाईकांकडे गेल्याची माहिती दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

त्यानुसार संबंधित नातेवाईकांच्या घरी पोलीस पथक शोधकामी गेले असता घर बंद आढळून आले. तसेच आरोपी व तिच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन बंद असल्याचे निदर्शनास आले असून, सध्या आरोपी निदा खान हिचा शोध सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790