नाशिक: थकीत करासह विविध गुन्ह्यांतर्गत जप्त 22 वाहनांचा होणार लिलाव

नाशिक। दि. २१ मार्च २०२६: नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या 22 वाहनांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय कार्यालयाने घेतला आहे. या वाहनांच्या संबंधित मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरून येत्या 15 दिवसात वाहन सोडवून घ्यावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

वायुवेग पथकाने जप्त केलेली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथील स्वयंचलित वाहन निरिक्षण व परिक्षण केंद्राच्या आवारात ठेवली आहेत. वाहने एकाच ठिकाणी उभी असल्याने त्यातून पेट्रोल/ डिझेल गळती होवून आग लागण्यासारखे प्रकार घडले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने व व्यापलेली जागा रिक्त करून घेण्यासाठी पुढील 30 दिवसांत वाहनाचे शुल्क भरून वाहने सोडवून न नेल्यास कार्यालयाने वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

संबंधित वाहनांची यादी परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आली आहे. वाहन सोडवून घेण्याची मुदत संपल्यानंतर ही वाहने बेवारस असल्याचे समजून त्यापैकी रस्त्यावर वापरण्यायोग्य वाहनांचा आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या व वापरण्यायोग्य वाहनांचा सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने पुढील 30 दिवसात लिलाव http://eauction.gov.in / www.mstdindia.co.in या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. लिलावाचा दिनांक,वेळ व ठिकाण संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेठ रोड , पंचवटी, नाशिक 422004 येथे संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790