नाशिक। दि. ११ मे २०२६: धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित निदा एजाज खान हिची पोलिस कोठडी सोमवारी (दि. ११) संपत असून, तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. तपासाचा भाग म्हणून तिचा जप्त केलेला मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयाने २ मे रोजी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तिचा शोध घेऊन ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान तिला एमआयएमशी संबंधित नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि अॅड. मिलिंद मुरकुटे काम पाहत आहेत, तर निदा खानच्या बाजूने अॅड. राहुल कासलीवाल हे न्यायालयीन बाजू मांडत आहेत. एसआयटीचे प्रमुख सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी निदासह तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी यांची सुमारे चार तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
![]()

