नाशिक: शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. १८) तीन तास वीजपुरवठा बंद राहणार

नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२५: महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या ३३/११ केव्ही मुक्तीधाम विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ई बस चार्जिंगसाठी नवीन उच्चदाब केबल जोडणीचे काम करण्यात येणार असल्याने शनिवार (दि. १८ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुक्तिधाम (देवळाली) विद्युत उपकेंद्र अंतर्गत वीज पुरवठा बंद राहणार आहे. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

मुक्तीधाम या विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्य बिटको, लॅम रोड, दत्त मंदिर, आनंदनगर, देवळालीगाव व सुभाष रोड या ११ केव्ही वाहिन्यांवरील वीज पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये दत्तमंदिर, जगताप मळा, वडनेर रोड, देवळाली गाव,विहितगाव,शिवसमर्थनगर,जुनौद्दीन डेपो,गांधी पुतळा,पवार वाडी,सुभाष रोड,गवळी वाडा, खोले मळा आणि चव्हाण मळा या परिसराचा समावेश असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

सदर काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीज पुरवठा अगोदर सुरू करण्यात येईल, तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790