‘म्हाडा’ फसवणूक प्रकरणाची २७ जुलैला पहिली सुनावणी; एसआयटीने प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

नाशिक। दि.७ जुलै २०२६ ‘म्हाडा’ची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गाजलेल्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात प्राथमिक दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पहिली न्यायालयीन सुनावणी येत्या २७ जुलै रोजी होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या...

तपासानुसार, चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या भूखंडांवरील गृहप्रकल्पांमध्ये ‘म्हाडा’साठी २० टक्के जागा राखीव ठेवणे कायद्याने बंधनकारक असतानाही, संबंधितांनी भूखंडांचे कृत्रिम विभाजन करून बनावट आराखडे तयार केल्याचा आरोप आहे. या कथित गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रानभाज्यांच्या संवर्धनासोबत बाजारपेठ विकासावर भर देण्याची गरज- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

तपासादरम्यान दोन बांधकाम व्यावसायिकांसह महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि महापालिकेच्या नगररचना विभागातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी तब्बल १२३ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी बहुतांश अर्ज मंजूर झाले असून, काही अर्ज फेटाळल्यानंतर संबंधितांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील घडामोडींवर लक्ष लागले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790