दुर्दैवी घटना: बिबट्याच्या हल्ल्यात २० वर्षीय युवतीचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील वनारवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात २० वर्षीय पायल राजेंद्र चव्हाण या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनारवाडीत गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने तालुक्यात भीती आणि हळहळ पसरली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

घटनेची माहिती अशी की, चव्हाण कुटुंब शेतात गवत कापण्याचे काम करत होते. यावेळी पायल ऊसाच्या बाजूने गवत कापत असताना अचानक मागून आलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. बिबट्याने पायलच्या मानेवर झडप घातली आणि तिला सुमारे ६ ते ७ फूट फरफटत नेले.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

पायलच्या शेजारी असलेल्या बहिणीने आरडाओरड करताच परिसरातील शेतकरी, वडील, चुलते व इतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गोंधळ आणि आवाजामुळे बिबट्याने पायलला सोडून पळ काढला.

तत्काळ पायलला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तिथे उपचार नाकारल्याने तिला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी तपासणी करून पायलला मृत घोषित केले.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790