HomeAd

नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा कायम; आठवड्यात तापमानात चढ-उतार, आर्द्रतेतही वाढ

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या आठवड्यात नाशिक शहरात तापमानात लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले असून, सर्वाधिक तापमान ४०.५ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आले. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार, उन्हाळ्याची तीव्रता कायम असून आर्द्रतेच्या पातळीतही वाढ होत आहे.

२० एप्रिल रोजी नाशिकमध्ये कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत २२ एप्रिलला ४०.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. २३ एप्रिल रोजी थोडीशी घसरण नोंदली गेली असून कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर २४ एप्रिलला तापमान ३८.३ अंशांवर घसरले, तर २५ एप्रिलला ते ३९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. २६ एप्रिल रोजी मात्र तापमान पुन्हा ३८.१ अंश सेल्सिअसवर स्थिरावले.

👉 हे ही वाचा:  नाशिक ग्रामीण जिल्ह्यात ‘नो ड्रोन प्लाय झोन’ घोषित

आतापर्यंतच्या तापमान चढउतारांमध्ये हवामान खात्याने आर्द्रतेतही वाढ नोंदवली आहे. सध्याची किमान तापमानाच्या वेळेसची सरासरी आर्द्रता ४५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उकाड्यातही लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांना जास्त वेळ उन्हात जाण्यापासून टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आज पावसाचा 'ऑरेंज', तर गुरुवारपर्यंत 'यलो' अलर्ट !

भारतीय हवामान विभागाने (www.imd.gov.in) दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत नाशिकमध्ये सौम्य वारे आणि हलक्याफुलक्या ढगांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर पाऊस अथवा तापमानात मोठ्या घसरणीची शक्यता अद्याप नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790