Amazon

नाशिक: अवैध सावकाराकडून कारसह ट्रॅक्टर, टेम्पो जप्त

नाशिक (प्रतिनिधी): सिडको अटकेत असलेला अवैध सावकार विवेक राणे याच्या भोवतीचा फास अधिक घट्ट झाला असून, त्याच्याकडून कार, ट्रॅक्टर आणि टेम्पो असा १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (दि.२६) पोलिस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील आणखी एक संशयित फरार आरोपी नीलेश जाधव याचा तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबड पोलिस ठाण्यात सावकार विवेक राणे यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. देवळा येथील फिर्यादी अमोल अहिरे सावकार राणे याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. दीड लाखाच्या बदल्यात एक लाख ८० हजार रुपये वसूल करूनही सावकार राणे यांनी फिर्यादी देवरे यांची सहा लाख रुपये किमतीची कार बळजबरीने घेऊन गेले. तसेच देवळा येथील शेतकरी कैलास देवरे याचाही सात लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर सावकार राणे याने ओढून आणून त्याची परस्पर विक्री केली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

दोन्ही घटनांमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात राणे यांच्या विरोधात अवैध सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे सचिन करंजे अनिल गाढवे, स्वप्नील जुद्रे यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790