नाशिक: ई-कार डीलरशिपच्या आमिषाने व्यावसायिकाची १४.०७ लाखांची फसवणूक

नाशिक। दि. २६ जुलै २०२६: इलेक्ट्रिक कारची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल १४ लाख ७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते जुलै २०२६ या कालावधीत संशयित मनीष परवा आणि महेश रेड्डी यांनी व्यावसायिकाशी संपर्क साधला. त्यांनी एका नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याचे आश्वासन देत कंपनीचे जीएसटी आणि सीआयएन क्रमांक वापरून विश्वास संपादन केला. त्यानंतर डीलरशिप प्रक्रियेच्या नावाखाली विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने १४ लाख ७ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

दरम्यान, डीलरशिपबाबत शंका आल्याने संबंधित व्यावसायिकाने थेट कंपनीच्या शोरूममध्ये चौकशी केली. त्यावेळी कंपनीकडून अशा कोणत्याही डीलरशिप प्रस्तावाची प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच संशयितांनी दिलेली कागदपत्रे बनावट असून त्यांचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचेही समोर आले.

दोन महिने उलटूनही डीलरशिप न मिळाल्याने व्यावसायिकाने संशयितांकडे विचारणा केली असता त्यांनी आणखी पैशांची मागणी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने संबंधित व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790