नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

नाशिक। दि. २५ जुलै २०२६: प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथील कालबाह्य कागदपत्रे (विडिंग आऊट), कार्यालयीन कालबाह्य अर्जांची विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून 28 जुलै 2026 पर्यंत दरपत्रके मागविण्यात आली आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

रद्दी खरेदी करणाऱ्यांनी 28 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपले दर (प्रती किलो) बंद लखोट्यात भांडार शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक यांच्याकडे सादर करावेत. 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता दरपत्रके प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे उघडण्यात येतील. त्यावेळी सोबत प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO NASHIK) यांच्या नावाने अनामत रक्कम 50 हजार रुपयांचा धनादेश सोबत आणणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

याबाबतच्या अटी व शर्ती अशा : दरपत्रकासोबत वैध शॉप अॅक्ट परवाना, जीएसटी क्रमांकाची नोंदणी प्रत, कोणत्याही शासकीय कार्यालयातील कालबाह्य रद्दी खरेदी केल्याच्या आदेशाची प्रत सादर करावी, कार्यालयातील रद्दी स्व- खर्चाने आहे त्या स्थितीत उचलून घ्यावयाची आहे. तसेच सदर काम हाताळताना कामगार व इतरांच्या संरक्षणाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खरेदीदाराची राहील. रद्दी विक्री केलेल्या पेपरची पुन्हा विक्री करता येणार नाही. रद्दीचा पलपिंग (लगदा) करण्यात यावा. ज्या ठिकाणी किंवा कारखान्यात लगदा करण्यात आला आहे त्या संस्थेचे / कारखान्याचे प्रमाणपत्र व विक्री केल्याचे बिल कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

जे पेपर रद्दीसाठी देण्यात येणार आहेत त्या पेपर्सला स्मार्ट कार्ड आरसी जोडलेली असल्यास ती पेपर्समधून वेगळी काढून कार्यालयास परत करण्याची जबाबदारी खरेदीदाराची राहील, रद्दीचे दर (प्रती किलो) देताना पेपर व पुष्ठ यांचे स्वतंत्रपणे द्यावेत, निविदा मंजूर झालेल्या खरेदीदारास कार्यालयाची रद्दी निविदा मंजूर झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत उचलणे बंधनकारक राहील. अन्यथा अनामत रकमेचा धनादेश शासकीय खात्यात जमा करून दरपत्रक रद्द करण्यात येईल, निविदा स्वीकारण्याचे व फेटाळण्याचे सर्व अंतिम अधिकार कार्यालय प्रमुख तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांना राहतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

निविदेतील अटी व शर्थी विहित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी खरेदीदाराची राहील, परिस्थितीनुसार आवश्यक त्या नवीन अटी अंतर्भूत करण्याचा अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी राखून ठेवला आहे, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गुंड यांनी म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790