नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील थकीत कर वाहनांचा होणार लिलाव

नाशिक, दि. 17 जून, 2025: नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी अडकवून ठेवलेल्या वाहनांपैकी 21 वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क केलेला नाही. तसेच वाहन सोडवून नेण्यासाठी हक्कही सांगितलेला नाही. या 21 वाहनांची जाहिर ई-लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या वाहनांची यादी कार्यालयातील फलकावर प्रदर्शित करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: ३० लाखांच्या कपड्याच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक !

ही वाहने बेवारस असल्याचे समजून सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने वाहंनाचा लिलाव http://eauction.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करीत हरित कुंभसाठी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात, विविध बस डेपो तथा पोलीस ठाणे यांच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकवून ठेवण्यास 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. अशा वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन, पर्यावरण कर भरून ती येत्या 15 दिवसांत सोडवून घ्यावीत. तसेच अधिक माहिती साठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेठ रोड, पंचवटी, नाशिक 422009 येथे संपर्क साधावा, असे आवहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गुंड यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790