नाशिकला पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’

नाशिक। दि. १८ जून २०२५: शहर व परिसरात मागील २४ तासांत १८.१ मिमी इतका मोसमी पाऊस पडल्याची नोंद आहे. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवसांकरिता नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास 22 जुलैपर्यंत मुदतवाढ

नाशिक शहर व परिसरात रविवारी तासाभरात ४२ मिमी इतका पाऊस झाला होता. यानंतर पावसाने विश्रांती घेतली जरी असली तरी अधूनमधून पावसाच्या हलक्या, मध्यम सरींचा वर्षाव सुरूच आहे. सोमवारी दिवसभर हलक्या सरींची रिपरिप सुरू होती. मंगळवारी त्या तुलनेने प्रमाण कमी झाले होते. दुपारी लख्ख ऊन पडले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: परिक्रमा मार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत जलालपूर येथील गट क्र. 57 चे खरेदीखत पूर्ण

सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत काहीसे ढगाळ हवामान व सरींचा हलका वर्षाव झाला होता. पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ४० ते ५० किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात मागील २४ तासांत मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १८.१ मिमी पाऊस झाला. १७ दिवसांत शहरात १४५ मिमी पाऊस पडल्याची मोजदाद हवामान निरीक्षक केंद्रात केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790