नाशिक: सापडलेल्या बालकांची पालकांना ओळख पटविण्याचे आवाहन

नाशिक, दि. 4 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): महिला व बालकल्याण समिती, नाशिक मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. बालकाची ओळख पटवून संपर्क साधाण्याचे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

असा आहे बालकांचा तपशील:
कुमारी अवनी अनिल उगारे
, वय 4 वर्षे हा बालिका 22 जुलै 2025 रोजी सातपूर पोलीस स्टेशन, ता.जि.नाशिक यांच्या हद्दीत विनापालक आढळून आली. या बालिकेस बालकल्याण समिती, नाशिक यांच्या आदेशान्वये आधाराश्रम संचलित विशेष दत्तक संस्था नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

कुमारी अनु बंसत, वय अंदाजे 5 वर्षे ही बालिका 11 जुलै 2025 रोजी नाशिकरोड बस स्थानक, ता.जि.नाशिक येथे विनापालक आढळून आली. नाशिकरोड पोलीस स्टेशन मार्फत या बालिकेस बालकल्याण समिती, नाशिक यांच्या आदेशान्वये आधाराश्रम संचलित विशेष दत्तक संस्था नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

बालिकांच्या भविष्याचा विचार करता कु.अवनी उगारे व अनु बंसत यांच्या पालकांनी आधाराश्रम नाशिक येथे 0253-2580309, 2950309 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाजकल्याण आवार, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 0253- 2236368 या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

ही माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत बालिकांचा दावा करण्यास कोणी आले नाही, तर संबंधित बालकांना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दुसाणे यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790