पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे नाशिक येथे 16 एप्रिल रोजी आयोजन

नाशिक। दि. १४ एप्रिल २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्यामार्फत मातोश्री इंन्स्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजी, धनोरे, ता.येवला, जि.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गुरूवार 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावासाठी युवाशक्ती स्किल इंडिया प्रा. लि, महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक, जेके मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, टपरिया टूल्स लि., ब्लूस्टार लि, बॉश लिमिटेड, नाशिक, स्पार्क एच आर सोल्युशन, नाशिक, क्वीज कोर्प लि., पुणे, सकोटा इंडिया प्रा.लि., पुणे, श्रीराम फायनांन्स लिमिटेड, नाशिक, आगा खान ग्रामीण सपोर्ट प्रोग्राम इंडिया (NGO), हिताची, जळगाव, लेग्रँड, जळगाव, रेमंड, जळगाव, एसबीएम बँक, अंधेरी, मारुती सुझुकी, मुंबई, ॲमेझॉन, भिवंडी, नवभारत फर्टिलायझर प्रा.लि, धुळे, संभाजीनगर, जळगाव, जेबीएम कोर्पस, पुणे, लुमॅक्स, पुणे, भारत फोर्स, रिच सिस्टीम सॉप्टवेअर सोल्युशन, डयुराटेक, सक्सेस एचआर सोल्युशन अशा एकूण 24 पेक्षा जास्त आस्थापना 15 हजार पेक्षा जास्त रिक्त पदांसह उपस्थित राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790