नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा ‘यलो अलर्ट’; घाटमाथ्यावर रविवारी ‘ऑरेंज अलर्ट’

नाशिक। दि. ११ सप्टेंबर २०२६: गेल्या महिनाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता हवामान विभागाच्या अंदाजामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून, शनिवारपासून सलग दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या दिवशी शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. मात्र, घाट परिसरात शुक्रवारी हवामान अधिक सक्रिय राहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तश्रृंगीगड-नांदुरी रस्ता बंद ठेवण्याच्या आदेशात सुधारणा; जाणून घ्या सविस्तर...

पावसाचा ‘यलो अलर्ट’ मात्र शनिवारपासून लागू होणार आहे. शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, वादळी वारेही वाहू शकतात. त्यानंतर रविवारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, पेठ, हरसूल आणि सुरगाणा या घाटमाथ्यालगतच्या भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

रविवारी जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, पेठ, हरसूल आणि सुरगाणा या घाटमाथ्यालगतच्या भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आगामी दोन दिवसांत होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790