Amazon

नाशिक: सप्तश्रृंगीगड-नांदुरी रस्ता बंद ठेवण्याच्या आदेशात सुधारणा; जाणून घ्या सविस्तर…

नाशिक। दि. ११ सप्टेंबर २०२६: सप्तश्रृंगीगड ते नांदुरी रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने दि. १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबत यापूर्वी आदेश निर्गमित करण्यात आला होता. या आदेशात आता सुधारणा करण्यात आली आहे.

सुधारित आदेशानुसार नांदुरी ते सप्तश्रृंगीगड रस्ता दि. १० ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत इतर दिवशी बंद राहणार असून शनिवार व रविवार दि. १२,१३,१९,२०, व २६ सप्टेंबर रोजी रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली कॅम्प येथे १३ नोव्हेंबर रोजी तोफखाना सराव; नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, नांदुरी ते सप्तश्रृंगीगड पायी मार्ग भाविकांसाठी नियमित सुरू राहणार असून सप्तश्रृंगी देवी मंदिरही नियमितपणे खुले राहणार आहे. अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) व स्कूल बस यांना या रस्ता बंदीतून सूट देण्यात आली आहे.
सर्व संबंधित यंत्रणांनी रस्ता बंद व वाहतूक व्यवस्थेबाबत आवश्यक ती दक्षता घेऊन कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची नोंद घेऊन कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये २५८ किलो मोतीचूर लाडू जप्त; 'या' आस्थापनेचे प्रमाणपत्र निलंबित... FDA ची धडक कारवाई !

सुधारित आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कळवण डॉ. कश्मिरा संखे यांनी दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी निर्गमित केला असून तो तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790