नाशिकला आज (दि. ६) ‘ऑरेंज अलर्ट’; घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नाशिक। दि. ६ जुलै २०२६: भारतीय हवामान विभागाने सोमवारी (दि. ६ जुलै) नाशिक शहर व परिसरासाठी ऑरेंज अलर्ट’, तर घाटमाथा आणि लगतच्या डोंगराळ भागांसाठी रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

रविवारी (दि. ५) मध्यरात्रीनंतर शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने वातावरणात उष्णता वाढली. दिवसभरातील कमाल तापमान ३१.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दुपारच्या सुमारास मखमलाबाद, मेरी आणि म्हसरूळ परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातही काही काळ मध्यम पावसाची नोंद झाली. अचानक झालेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘शिक्षण उत्सव २०२६’मधून शिक्षकांच्या कार्याचा गौरव; संवाद, नवोपक्रम आणि सहकार्याला नवी दिशा

पेठरोड येथील हवामान निरीक्षण केंद्रात दिवसभरात २.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, गंगापूर, काश्यपी तसेच गौतमी-गोदावरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.

सोमवारी नाशिकसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ लागू असल्याने शहर आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी नागरिकांनी प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानेही नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, पावसाचा जोर वाढल्यास किंवा विजांच्या कडकडाटासह हवामान प्रतिकूल झाल्यास विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790