नाशिक: महावितरणच्या दोन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

नाशिक। दि. ६ जुलै २०२६: जेल रोड परिसरात दिनांक १ जुलै रोजी झालेल्या वीज अपघात प्रकरणी महावितरण कंपनीने गंभीर दखल घेतली असून कनिष्ठ तंत्रज्ञांच्या निलंबनानतर नाशिक परिमंडळ आणि मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन व सुरक्षा) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर नोटीस कोकण प्रादेशिक कार्यालयाकडून बजावली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भद्रकाली मंदिरातील सिंहाची मूर्ती चोरीला; तासाभरात दोघे ताब्यात

या दुर्दैवी अपघातात महावितरणच्या जय सकट या कनिष्ठ तंत्रज्ञाचा मृत्यू झाला. यावेळी तंत्रज्ञ राजेश चौरे समवेत कार्यरत होते. काम करताना आवश्यक सुरक्षित साधनांचा वापर केला नाही तसेच सहकाऱ्याची काळजी घेतली नाही या कारणांमुळे तंत्रज्ञ राजेश चौरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध- मंत्री प्रकाश आबिटकर

तसेच विद्यूत सुरक्षेची जबाबदारी असणारे सदर दोन्ही कार्यकारी अभियंता यांनी जनमित्रांचे सुरक्षा साधनांचा वापर करण्या संदर्भात योग्य प्रकारे प्रबोधन केले नाही, अशी विचारणा करीत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790