नाशिक: घरफोडीतील चार वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

नाशिक। दि. ६ जुलै २०२६: गुन्हे शाखा युनिट-२ ने घरफोडी प्रकरणातील चार वर्षांपासून फरार असलेल्या दानिश निसार खान (३१) याला अटक केली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

आयशा मशिदीजवळील रजा क्लासिक अपार्टमेंट परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला उपनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक संजय सानप, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, महेश खांडबहाले, तेजस मते आणि जितेंद्र वजीर यांच्या पथकाने केली.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790