Amazon

नाशिक: फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार; कुटुंबीयांना जीवे मारण्याचीही धमकी

नाशिक। दि. १६ नोव्हेंबर २०२६ : महिलेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार नाशिकच्या इंदिरानगर परिसरात उघडकीस आला आहे. तसेच पीडितेच्या आई-वडिलांसह मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संदीप निरभवणे याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १ लाख ५१ हजार पणत्यांतून साकारली भव्य प्रतिकृती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ ते जानेवारी २०२६ या कालावधीत पीडितेच्या राहत्या घरी हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. संशयित आरोपीने महिलेचे मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले होते. हे खासगी फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेवर दबाव टाकला आणि वारंवार तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

🔎 हे वाचलं का?:  चेंबूरमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिकमध्ये सुखरूप सुटका; संशयित ताब्यात

इतकेच नव्हे, तर या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास पीडितेच्या आई-वडिलांसह मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित संदीप निरभवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790