Amazon

नाशिक: गॅस कनेक्शन कामाच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग

नाशिक, दि. १६ नोव्हेंबर २०२६ : एमएनजीएल गॅस कनेक्शन बसविण्याच्या कामाच्या बहाण्याने घरात प्रवेश करून एका कामगाराने युवतीचा हात पकडत विनयभंग केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली. युवतीने प्रसंगावधान राखत प्रतिकार केला आणि आजीला आवाज दिला. यामुळे घाबरलेल्या संशयिताने आपली बॅग उचलून घटनास्थळावरून पळ काढला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट Instagram अकाउंट; नाशिक सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

ही घटना गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित इमारतीमध्ये गेल्या महिनाभरापासून एमएनजीएल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याच कामाचा भाग म्हणून एक कामगार गॅस कनेक्शन बसविण्यासाठी युवतीच्या घरी आला होता.

काम पूर्ण झाल्यानंतर संशयिताने साफसफाईसाठी विम लिक्विड मागितले. ते आणण्यासाठी युवती स्वयंपाकघरात गेली असता, घरात आजी बाजूला असल्याची संधी साधून संशयिताने तिचा हात पकडला. या प्रकारामुळे युवतीने तातडीने प्रतिकार करत आजीला आवाज दिला.

🔎 हे वाचलं का?:  चेंबूरमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिकमध्ये सुखरूप सुटका; संशयित ताब्यात

आजी घटनास्थळी येताच संशयिताने आपली बॅग उचलली आणि इमारतीच्या मागील प्रवेशद्वारातून पळ काढला. या घटनेनंतर युवतीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असून, पसार झालेल्या संशयिताचा शोध घेतला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790