Amazon

चेंबूरमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिकमध्ये सुखरूप सुटका; संशयित ताब्यात

नाशिक। दि. १४ नोव्हेंबर २०२६: मुंबईतील चेंबूर येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिकमध्ये सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३ पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून ३४ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. यावेळी अपहृत मुलगीही त्याच्यासोबत आढळून आली.

प्रशांत उर्फ ठाकरे रवि गायकवाड (रा. पोस्टल कॉलनी, चेंबूर, मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात २४ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर पोलीस ठाण्यात ३१ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. अज्ञात व्यक्तीने मुलीचे पालकांच्या कायदेशीर ताब्यातून अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

दरम्यान, अपहृत मुलगी नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे १२ नोव्हेंबर रोजी पोलिस पथकाने रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवृत्तीवेतनधारकांसाठी स्मार्टफोनवरून हयातीचा दाखला सादर करण्याची डिजिटल सुविधा

यावेळी पोलीस अंमलदार गौरव धात्रक यांनी संबंधित मुलीला ओळखले. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने मुलीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. तिच्यासोबत असलेल्या प्रशांत गायकवाड यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली अस्ताला, संशयित आरोपीला पहिली पत्नी आहे. असे असतांना त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आधाराश्रमातील बालकाला मिळाले परदेशी दाम्पत्याचे मायेचे छत्र !

अनेक धार्मिक स्थळांवर फिरवल्याची माहिती:
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयिताने मुलीला तिरुपती बालाजी, कोल्हापूर, अक्कलकोट, सोलापूर, गाणगापूर तसेच ओडिशातील पुरी यांसारख्या विविध धार्मिक स्थळांवर नेले होते.

चेंबूर येथून अपहरण झालेल्या मुलीची नाशिकमध्ये सुखरूप सुटका झाल्याने या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790