NC

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. १७ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि. १७ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची सूचना दिली आहे.

नाशिक शहरातील काही भागांत शनिवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : सिग्नल नियमभंगावर कारवाई; आतापर्यंत 'इतक्या' वाहनचालकांना ई-चलन

नाशिक मनपाचे पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील आरपी विदयालय/हनुमानवाडी जलकुंभ भरणेसाठी जुनी पंपींग मशिनरी बदलविण्याचे नियोजन आहे…

ही नवीन पंपींग मशिनरी बसविणेचे काम करावयाचे असल्याने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील सदर जलकुंभाचे पंपींग बंद ठेवावे लागणार आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11515,11512,11510″]

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यामुळे पंचवटी परिसरातील प्रोफेसर कॉलनी, मोरे मळा, हनुमानवाडी क्रांतीनगर, कृष्णनगर, शिंदे नगर, जाणता राजा कॉलनी, जगझाप मार्ग, जाधव कॉलनी, मधुबन कॉलनी, नाग चौक, गजानन कॉलनी, सितागुंफा, सरदार चौक, सुकेणकर लेन, ढिकलेनगर, गुरुद्वारा रोड, निमाणी बस स्टॅण्ड, वाल्मिकनगर, संजयनगर, बुरडवाडी, वाघाडी परिसर, आरपी विदयालय परिसर, श्रीराम विदयालय परिसर इ. ठिकाणचा शनिवार दि. 17/09/2022 रोजीचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच दि. 18/09/2022 रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल,  याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790