नाशिक: शेअर मार्केटमध्ये ‘जादा परताव्याचे’ आमिष; तिघांना तब्बल ९० लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक। दि. २८ फेब्रुवारी २०२६: शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी शहरातील तिघांकडून सुमारे ९० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी व साक्षीदार यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे सांगत आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. संबंधित तिघांपैकी एक जण म्युच्युअल फंड कंपनीत कार्यरत असल्याची माहितीही समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी व साक्षीदारांनी मिळून एकूण ९० लाख ४७ हजार ७४४ रुपये ऑनलाइन व्यवहारांद्वारे संबंधित खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र, आश्वासित नफा तर दूरच, मूळ गुंतवणुकीची रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

यानंतर पीडितांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी उच्च परताव्याच्या आमिषाला बळी न पडता कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी व प्लॅटफॉर्मची खातरजमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790