नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 मार्च रोजी विशेष मोहीमेचे आयोजन

नाशिक। दि. २८ फेब्रुवारी २०२६: नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात काही मतदारांचे मतदार यादीमध्ये दुबार नावे, स्थलांतर, फोटो दुरुस्ती व मतदार यादीची जुळवणी व पडताळणी करण्यासाठी महानगरपालिका विभागीय कार्यालय, नवीन नाशिक व सातपूर येथे 1 मार्च, 2026 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

या मतदार संघाच्या मतदार यादीतील अस्पष्ट, आकार विरहीत व मानवी नसलेल्या छायाचित्रांची पडताळणी करुन मतदारांकडून स्पष्ट फोटो प्राप्त करुन यादी सन 2002 च्या यादीशी सन 2024 च्या यादीशी जुळवणी व मतदार यादीचे शुध्दीकरण कामकाज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत सुरु आहे. त्यानुषंगाने सर्व केंद्रस्तरीय अधिकारी महानगरपालिका विभागीय कार्यालय, सातपूर व नवीन नाशिक येथे सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत उपस्थित राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

ज्या मतदारांचे मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, फोटो, मोबाईल क्रमांक यामध्ये दुरुस्ती व सन 2022 च्या यादीशी जुळवणी करण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व सोबत येतांना मतदान कार्ड आणावे, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790