नाशिक : सिग्नल नियमभंगावर कारवाई; आतापर्यंत ‘इतक्या’ वाहनचालकांना ई-चलन

नाशिक। दि. २७ फेब्रुवारी २०२६: शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात ई-चलन प्रणालीद्वारे कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत वाहतूक विभागाने तब्बल १,३५६ वाहनचालकांवर ऑनलाइन दंडाची कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

गुरुवारी (दि. २६) सीबीएस, मेहर सिग्नल, गडकरी चौक आणि गंगापूर नाका या महत्त्वाच्या चौकांमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ९ दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत सिग्नल तोडणे आणि झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे यांसारख्या नियमभंगासाठी ३८९ वाहनचालकांना ई-चलन पाठवण्यात आले.

शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे काही ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे. मात्र, सिग्नल नियमांचे पालन न केल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाने नोंदवले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तुमच्या दुकानात बालकामगार काम करतोय? होऊ शकते कठोर कारवाई !

सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सिग्नल जंपिंग आणि झेब्रा क्रॉसिंग उल्लंघन करणारी वाहने ओळखून संबंधित वाहनांच्या क्रमांकाच्या आधारे थेट मोबाइलवर दंडाची नोटीस पाठवली जात आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790