नाशिक: शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. २३) पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिक। दि. २२ मे २०२६: सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. परिणामी, शनिवारी (दि. २३) या दोन्ही विभागांतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहाणार आहे, तर रविवारी (दि. २४) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

नाशिक पश्चिम भागातील जलकुंभभरणारी ५०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. सिमेंटची मुख्य गुरुत्व वाहिनी आहे. या वाहिनीला मोतीवाला कॉलेज रोड येथे मोठी पाणी गळती सुरू झाली आहे. ही गळती रोखण्यासाठी शनिवारी तातडीने दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

प्रभाग क्र. ०७: नहुष सोसायटी परिसर, माणिकनगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर, डॉन बास्को, तिरुपती हाउस परिसर, तेजोप्रभा कॉलनी, श्रमिक कॉलनी परिसर, दादोजी कोंडदेव नगर, आयचित नगर, चैतन्य नगर, सहदेव नगर, पंपिंग स्टेशन परिसर, गीतांजली सोसायटी, रामराज्य जलकुंभ परिसर, पूर्णवाद नगर, आकाशवाणी टॉवर परिसर, सुयोजित गार्डन परिसर आणि शांती निकेतन परिसर.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

प्रभाग क्र. ०८: सावरकरनगर, नरसिंह नगर, दाते नगर, आनंदवल्ली, नवश्या गणपती मंदिर परिसर, बेंडकुळे नगर, गंगापूर गाव, सोमेश्वर कॉलनी, खांदवे नगर, सद्‌गुरु नगर, सुयोग कॉलनी आणि काळेनगर परिसर.

प्रभाग क्र. ०९: रामेश्वर कॉलनी, 3 श्रमिक नगर परिसर, गंगासागर नगर, अहिल्याबाई होळकर चौक, धर्माजी कॉलनी, जिजामाता कॉलनी, शिंदोरी रस्ता परिसर, कडेपठार चौक, छ. संभाजीनगर परिसर आणि ध्रुवनगर परिसर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १०: अशोक नगर ३ जलकुंभ परिसर, जाधव संकुल, सुला चौक ते पपया नर्सरी चौक, मौले हॉल, अंबिका स्वीट्समागील परिसर इत्यादी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790