नाशिक: मानसिक आजारी रुग्णांच्या कुटुंबियांसाठी १ मार्च रोजी विनामूल्य प्रशिक्षण शिबिर; आगाऊ नोंदणी अनिवार्य

नाशिक। दि. २७ फेब्रुवारी २०२६: मानसिक आजाराशी झुंज देताना केवळ रुग्णच नव्हे, तर त्याचे कुटुंबीयही भावनिक आणि मानसिकदृष्ट्या थकून जातात. आजाराविषयी अपुरी माहिती, रुग्णाशी कसे वागावे याबाबतची संभ्रमावस्था आणि घरातील तणावपूर्ण वातावरण — या सर्वांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. या पार्श्वभूमीवर मानसिक आजारी व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी नाशिकमध्ये विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, नाशिक सायकियाट्रीक सोसायटी आणि लायन्स क्लब नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच प्राज फाउंडेशन यांच्या आर्थिक सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे विनामूल्य प्रशिक्षण शिबिर १ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत नाशिकमधील मध्यवर्ती ठिकाणी होणार आहे.

शिबिराचा उद्देश काय?:
मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेताना कुटुंबीय अनेक प्रश्नांनी ग्रासलेले असतात —
रुग्ण निराश का होतो? आक्रमक का वागतो? त्याला समजावून कसे सांगावे? घरातील वातावरण सकारात्मक कसे ठेवावे?

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

अनेकदा अज्ञानामुळे घरात वाद निर्माण होतात आणि तणाव वाढतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते औषधोपचारांसोबत कुटुंबीयांचे योग्य सहकार्य मिळाल्यास मानसिक आजारातून हळूहळू सुधारणा होऊ शकते. या शिबिरात मनोविकारतज्ज्ञ (सायकियाट्रीस्ट डॉक्टर) मानसिक आजाराचे स्वरूप, उपचारपद्धती, कुटुंबियांना पडणारे सामान्य प्रश्न तसेच स्वतःची मानसिक काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

कोण सहभागी होऊ शकतात?:
जे रुग्ण सध्या मानसिक आजारासाठी औषधोपचार घेत आहेत किंवा ज्यांना उपचारांची गरज आहे, अशा व्यक्तींचे कुटुंबीय आगाऊ नावनोंदणी करून या शिबिरात सहभागी होऊ शकतात. शिबिराच्या ठिकाणी २०० रुपये भरून सहभागी कुटुंबियांना स्वाध्याय पुस्तक उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे:
📞 7040205175 📞 9225575432

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790