नाशिक: शहरातील ‘या’ विविध भागांतील वाहतूक मार्गात आज (दि. २६) महत्वाचे बदल

नाशिक। दि. २६ ऑगस्ट २०२६: शहरात बुधवारी ‘ईद-ए- मिलाद’ निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहर वाहतूक विभागाने भद्रकाली, नाशिकरोड, इंदिरानगर परिसरांतील वाहतूक मार्गात बदल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

बुधवारी सकाळी नऊ ते मिरवणूक संपेपर्यंत हे बदल कायम राहतील. भद्रकाली भागातून चौक मंडई-बागवानपुरा-कथडा मस्जिद-शिंपी गल्ली-आझाद चौक-चव्हाटा देवी मंदिर-दूध बाजार- पिंजार घाट-बडी दर्गा यामार्गे मिरवणूक जाईल. त्यामुळे सारडा सर्कल ते हाजी टी पॉईंट, शिरसाठ हॉटेल ते आझाद चौक, खडकाळी सिग्नल ते दूध बाजार हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ते ३० ऑगस्ट सिंहस्थ 'महाकुंभ भक्ती संगम'चे आयोजन

बदल असे: नाशिकरोड परिसरात सिन्नर फाटा – छत्रपती शिवाजी महाराज चौक-बिटको चौक-अनुराधा चौक-सत्कार पॉईंट-देवळाली गाव-विहितगांव सिग्नल- बागूल नगर-देवळाली गाव- नाशिक महानगरपालिका मैदान या मार्गाने मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे बिटको सिग्नल ते विहितगाव सिग्नल, विहितगांव सिग्नल ते बिटको सिग्नल रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ईदनिमित्त इंदिरानगर भागातही मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमुळे कलानगर ते मदिना चौक रस्ता बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790