वाहनधारकांनो लक्ष द्या… PUC तपासणीसाठी आता इतके रुपये मोजावे लागणार

नाशिक। दि. २६ ऑगस्ट २०२६: राज्यातील मोटार वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीच्या दरात सुधारणा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या सुधारित दरांची संबंधित वायू प्रदूषण तपासणी केंद्रांनी नोंद घेऊन त्यानुसार वाहनांची वायू प्रदूषण तपासणी शुल्क आकारणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

सुधारित दरानुसार दुचाकी वाहनांसाठी ५० रुपयांऐवजी ६० रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनांसाठी १०० रुपयांऐवजी १२० रुपये, पेट्रोल, सीएनजी व एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी १२५ रुपयांऐवजी १५० रुपये, तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी 150 रुपयांऐवजी 180 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन,ठाणे यांनी वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीचे दर वाढविण्याबाबत शासनाकडे मागणी केली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १५ सप्टेंबर रोजी त्रैमासिक बैठक

यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने संबंधित बाबींचा विचार करून निर्णय घेण्याची कार्यवाही केली. त्यानुसार राज्यातील वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीच्या विद्यमान दरात सुधारणा करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790